- ड्राय रनमध्ये २५ जणांची लसीकरणासाठी निवड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयात लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे. शासन आदेशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयामध्ये Conducting dry run for Covid – 19 Vaccination अंतर्गत मॉक ड्रील ( प्रात्यक्षिक ) चे आयोजन दि. ०२ जानेवारी २०२१ रोजी करण्यात येणार आहे.
याची पहाणी आज शुक्रवारी (दि .०१) रोजी आयुक्त श्रावण हर्डीकर, अति. आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. संगीता तिरूमणी, डॉ. बाळासाहेब होडगर व महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी केली.
या लसीकरणाच्या ड्राय रनमध्ये निवडण्यात आलेल्या ठिकाणच्या २५ जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही. मात्र त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष केले जाणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
















