- आज ७५ जणांना कोरोनाची बाधा; ९६ रुग्णांना डिस्चार्ज, ४ रुग्णांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. ०४ जानेवारी) रोजी ७५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ४ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – प्राधिकरण (७६ वर्षे) ०२ स्त्री – भोसरी (८० वर्षे), चिंचवड (६८वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – शिरोली बुद्रुक (५५ वर्षे) येथील रहिवासी आहे.
इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील २६८ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी ७ प्रवाशांचे नमुने NIV पुणे येथे UK स्ट्रेन करीता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविले असता ०२ अहवाल नकारात्मक व ०५ अहवाल प्रलंबित आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९७०३५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९३६६७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७६२ जणांचा मृत्यू झालेला आहे.