- व्यवसायासाठी अर्थसहाय्य योजना व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२१) :- नगरसेवक भाऊसाहेब भोईर आणि पिंपरी चिंचवड महिला बचत गट महासंघ यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पार्थ पवार यांच्या सहकार्याने दि. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते सायं ५ वा. मनीषा स्मृति निवास, भोईर नगर चिंचवड येथे महिला व युवकांना व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य योजना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रभागातील महिला आणि युवकांनी या मार्गदर्शन शिबिरास चांगल्या प्रमाणात प्रतिसाद नोंदविला. सदर कार्यक्रमात उद्योग का करावा या बाबत विषय तज्ञांनी माहिती दिली तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी यांनी शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे अधिकारी यांनी कागदपत्रांची सविस्तर माहिती आणि पोर्टलवर नोंदणी याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच नोंदणी झालेल्या युवक व महिलांची यादी करून त्यांची शंका निरसन करून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहराच्या माजी महापौर मंगला कदम यांनी आपल्या भाषणात महिलांना उद्योजकतेचे धडे दिले तसेच महिला कोणत्या स्वरुपात व्यवसाय करून प्रगती करू शकतात पटवून दिले.
कविता खराडे यांनी महानगरपालिके मार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना आणि त्यांची सविस्तर माहिती दिली तसेच या योजनांद्वारे महिलांना व युवकांना प्रोजेक्ट रिपोर्टप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी १ लाखांपासून ५० लाखापर्यंत कर्ज मिळू शकते याबद्दल माहिती दिली.
यावेळी माजी महापौर मंगला कदम, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष हर्षवर्धन भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे अधिकारी अधिकारी नितीन बेंद्रे, सारंग बिडकर, कविता खराडे- अध्यक्षा स्वयंरोजगार व महिला बचत गट महासंघ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर, शीलाताई भोंडवे अध्यक्षा महिला बचत गट सेल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर, संगीताताई कोकणे- महिला अध्यक्ष चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, सुप्रिया भिंगारे – महिला संघटक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी. पिंपरी चिंचवड शहर, अनिता गायकवाड उपाध्यक्ष – पिंपरी चिंचवड महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस सौ. मंगल ढगे आणि परिसरातील महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















