- ‘जशी आहेत तशी’ या तत्त्वावर वाहनांची होणार विक्री…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२१) :- मोशी येथील उपप्रादेशिक कार्यालयाने विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या २८ वाहनांचा ई – लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव १० मार्चला सकाळी अकरा ते पाच या वेळेत कार्यालयात होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.
बस, ट्रक, पिकअप व्हॅन, दुरिस्ट टॅक्सी, जेसीबी, एलएमव्ही मोटारीचा या वाहनांत समावेश आहे. या लिलावात सहभागी होण्यासाठी ३ मार्च या दरम्यान www. eauction.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणीनंतर ४ ते ५ या कालावधीत उपप्रादेशिक कार्यालयातील खटला विभागात सकाळी अकरा ते पाच या वेळेत एक लाख रुपयांचा डीडी भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आरटीओ कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर नियम व अटी उपलब्ध आहेत. जशी आहेत तशी या तत्त्वावर वाहने ई लिलावाद्वारे विकली जाणार आहेत.


















