- मेडिकलचे दुकान फोडले; घरातून ऐवज लंपास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. मार्च. २०२१) :- घरफोडीसह चोरट्यांनी वाहनांचे सायलेन्सर चोरुन नेले. मेडिकलच्या दुकानातून तसेच गैरेजमधून चोरट्यांनी रोकड चोरुन नेली. या चार चोरीच्या घटना पिंपळे गुरव येथे घडल्या. स्वप्नील रामदास निकम (वय ३१, रा. भाऊनगर, पिंपळे गुरव) यांनी शनिवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निकम यांचे गांगर्डेनगर, पिंपळे गुरव परिसरात संजिवनी नावाचे मेडिकलचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले. शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून पाच हजार ६०० रुपयांची रोकड चोरून नेली.
तसेच अकबर रफिक शेख, सिकंदर बाबुमिया पटेल या दोघांच्या दोन वाहनांचे सायलेन्सर चोरट्यांनी चोरून नेले. तसेच रामलिंग बाबुराव चपटे यांच्या श्रीराम सर्व्हिस सेंटर या गॅरेजमधील रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली.
















