- एकावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. मार्च २०२१) :- वाकड परिसरात गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस गस्त घालत होते. सोमवारी पहाटे सव्वा दोन वाजताच्या सुमारास अष्टविनायक कॉलनी येथील पंडित पेट्रोलपंपासमोर असलेल्या बँकेच्या एटीएममध्ये रोकड पळवण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली.
पोलिसांनी एटीएम सेंटरकडे धाव घेतली असता एक अल्पवयीन मुलगा एटीएमच्या बाहेरील बाजूचा पत्रा उचकटून आतील पैशांचे ट्रे उचकटण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन त्याचा एटीएम मधील रोकड पळवण्याचा डाव उधळून लावला.
हा प्रकार सोमवारी (दि. ८) पहाटे घडला. गुन्हे शाखा युनिट चारचे सहाय्यक पोलीस फौजदार धर्मराज आवटे यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.