न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. १५ मार्च) रोजी ७२८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ६७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – पिंपरी (२९ वर्षे), वडमुखवाडी (८३ वर्ष), संत तुकारामनगर (५३ वर्षे), १ स्त्री वाकड (५७ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ११४७५४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०५९२९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८८० जणांचा मृत्यू झालेला आहे.
प्रभागनिहाय रुग्णसंख्या अ – ९७, ब – १०८, क – ६५, ड – १६८, इ – ५५, फ – ९३, ग – ८८, ह – ५४ एकुण – ७२८ अशी आहे.
















