मराठी शाळांचा शास्तीकर व दंड माफीचा प्रस्ताव स्थायीत मंजूर..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मार्च २०२१) :- करोना प्रादुर्भावामुळे मराठी शाळा जवळपास वर्षभरापासून बंद आहेत. संबंधित शाळांचे आर्थिक उत्पन्न कमी आहे. तुलनेत त्यांची कोट्यवधी रुपयांची मिळकतकर थकबाकी प्रलंबित आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी शास्तीकर व करावरील दंड माफ करावा. तसेच, शाळांचे व्यावसायिक वापर नोंदणी न दाखविता रहिवाशी वापर नोंदणी करावी, असा सदस्य प्रस्ताव बुधवारी (दि. १७) स्थायी समिती सभेत आयत्यावेळी मंजूर करण्यात आला.
शहरामध्ये मराठी माध्यमाच्या सुमारे २२५ शाळा आहेत. त्यामध्ये महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण १०४ शाळा आहेत. महापालिका करसंकलन विभागाकडे मराठी, इंग्रजी, उर्दू आणि हिंदी माध्यमाच्या एकूण ३२५ शाळांची नोंद आहे. त्यातील ६८ शाळांना अवैध बांधकाम शास्ती लागू आहे. त्यां
च्याकडून थकबाकी आणि चालू मागणीसह २३ कोटी ९१ लाख ६८ हजार रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. या थकबाकी रकमेपैकी ६ कोटी २६ लाख १७ हजार रुपये इतकी अवैध बांधकाम शास्तीची रक्कम आहे. दरम्यान, आयुक्त राजेश पाटील याबाबत काय निर्णय घेतात, त्यावरच अंतिम निर्णय अवलंबून असणार आहे.















