न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. १८ मार्च) रोजी १२९६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ४०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – चिंचवड (६४ वर्षे), पिंपरी (६५ वर्षे), मोशी (७५ वर्षे), पिंपळे गुरव (७५वर्षे) ०१ स्त्री – शिवतेजनगर (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष कोथरुड (७५ वर्षे), वाकडेवाडी (५५ वर्षे), सातारा (६९ वर्षे), करमाळा (७१वर्षे) येथील रहिवासी आहेत. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ०४ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ११८१९२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०७५०२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८८६ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या :- अ – १६४, ब – २३३, क – ११३, ड – २३८, इ – १३९, फ – १३६, ग – १३४, ह – १३९
एकुण – १२९६.















