- सोन्याच्या बांगड्या व इतर ऐवज लंपास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२१) :- तोंडाला कपडा लावून बेशुद्ध करून महिलेचे तिच्या राहत्या घरातून अपहरण केले. तसेच दागिने व मोबाईल काढून घेतला. पिंपरी येथे शनिवारी (दि. २०) सकाळी सव्वानऊच्या सुमारास हा प्रकार घडला. दोन अनोळखी आरोपींच्या विरोधात याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमृता सनी लालचंदानी (वय २७ रा, साई चौक, पिंपरी) यांनी या प्रकरणी शनिवारी फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांच्या राहत्या घरी शनिवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास २५ ते ३० वर्ष वयाचे दोन अनोळखी आरोपी त्यांच्या घरी आले. त्यावेळी फिर्यादीच्या घरातील इतर सदस्य वरच्या मजल्यावर होते. घरातील लोकांबाबत आरोपीने फिर्यादीकडे चौकशी केली.
त्यानंतर फिर्यादी महिलेला शुद्ध आल्यावर फ्रेंडशिप गार्डन जवळ असल्याचे लक्षात आले. त्यांच्या हातातील एक लाख रुपये किमतीच्या ३७ ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या व सोन्याच्या दोन अंगठ्या तसेच १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल आरोपी जबरदस्तीने काढून घेऊन गेले असल्याचे फिर्यादी यांना समजले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.


















