- वाल्हेकरवाडीत व्यावसायिकसह निवासी इमारती जमीनदोस्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकारणाने अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाईचे सातत्य ठेवत मंगळवारी (दि. २३) रोजी वाल्हेकरवाडी येथील अथर्व पार्कमधील सर्वे नं १२४, १२५, १२६ मधील २५०० चौरस फुटात व्यावसायिक कारणासाठी उभी करण्यात आलेली चार मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई केली.
कारवाईची मोहीम ३ मार्चपासून सुरू केली आहे. मंगळवारी नवनगर विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व अतिक्रमण पथकाच्या वतीने वाल्हेकरवाडी येथील अथर्व पार्कमधील २५०० चौरस फुटात उभी करण्यात आलेली चार मजली अनधिकत व्यावसायिक इमारतीवर दोन जेसीबी, दोन पोकलेन व दोन ब्रेकरच्या साहाय्याने कारवाई केली. बुधवारी (दि. ३), शुक्रवार (दि १२), शुक्रवार (दि. १९) रोजी अशाच प्रकारे कारवाई करीत याच परिसरातील पाच इमारती भुईसपाट केल्या होत्या. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाचे अभियंते, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व अतिक्रमण पथकाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.
वाल्हेकरवाडी येथील सहें नंबर १२४,१२५ आणि १२६ अथर्व पार्कमध्ये पाच गुंठे जागेतील सुमारे ८ हजार ८०० चौ.फुट तीन गुंठे जागेमधील चार मजली डमारतीचे सुमारे ९ हजार ५०० चौ.फुट बांधकाम पाडले आहे. गुरुद्वारा चौकातील ३ गुंठे जागेतील सुमारे ८ हजार ५०० चौरस फूट तीन मजली इमारत भुईसपाट केली आहे. या कारवाईसाठी तीन पोकलेन, दोन जेसीबी, दोन ट्रॅक्टर ब्रेकर यांचा वापर करण्यात आला. नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत अनधिकृत बांधकामामध्ये सर्वसामान्य लोकांनी घरे अथवा गाळे खरेदी विक्री करु नये. खरेदी करण्यापूर्वी बांधकामांची बांधकाम परवानगीच्या कागदपत्रांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे