- गळ्यातील एक लाख ६० हजारांची सोन्याची माळ लंपास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२१) :- क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेच्या गळ्यातील एक लाख ६० हजारांची सोन्याची माळ तीन चोरटयांनी पळवून नेली. ही घटना मंगळवारी (दि. २३) सकाळी थेरगाव येथे घडली.
फुलाबाई जगन्नाथ पाटील (वय ७३, रा. थेरगाव) यांनी मंगळवारी (दि. २३) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी पाटील या थेरगाव येथील सध्रुव कॉम्प्लेक्स येथून पायी चालत जात होत्या. त्यावेळी एक व्यक्ती पाटील यांच्याजवळ आला. ‘आमच्या साहेबांनी बोलावले आहे’ असे सांगून त्या व्यक्तीने दुस-या व्यक्तीकडे नेले.
तिस-या व्यक्तीचे ‘आम्ही क्राईम ब्रांचचे पोलीस आहे. आम्हाला संरक्षणाकरिता नेमलेले आहे’ असे म्हटले. पाटील यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची ४० ग्रॅम वजनाची एक लाख ६० हजारांची माळ काढण्यास सांगितले. पाटील त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ काढत असताना ती केसात अडकली. त्यावेळी एका आरोपीने ती काढून पाटील यांच्या बॅग मध्ये ठेवल्याचा बहाणा केला. त्यानंतर चोरटे पाटील यांची सोन्याची माळ घेऊन दुचाकीवरून पळून गेले.
















