पालिका आयुक्त राजेश पाटील यांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, विविध घटकांशी समन्वय साधण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या आदेशाची प्रभावीरित्या अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
त्यात सहाय्यक आयुक्त सुनील अलमलेकर यांच्याकडे यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल, बाळासाहेब खांडेकर यांच्याकडे जम्बो हॉस्पिटल, मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांच्याकडे घरकुल कोविंड केअर सेंटर, नगर सचिव उल्हास जगताप यांच्याकडे ऑटो क्लस्टर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे अ ‘ क्षेत्रीय कार्यालय, मकरंद निकम यांच्याकडे ‘ ब ‘ क्षेत्रीय कार्यालय, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण ‘ क ‘ क्षेत्रीय कार्यालय , उपायुक्त अजय चारठणकर यांच्याकडे ‘ ड ‘ क्षेत्रीय कार्यालय, संदीप खोत ‘ फ ‘ क्षेत्रीय कार्यालय, चंद्रकांत इंदलकर ‘ ड ‘ क्षेत्रीय कार्यालय, सहायक आयुक्त नीलेश देशमुख या क्षेत्रीय कार्यालय आणि अण्णा बोदडे यांच्याकडे ‘ ह ‘ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी दिली आहे.
















