न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२१) :- महापालिकेचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
तसे आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी काढले आहेत. पालिका सर्वसाधारण सभेने २० जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत डॉ. गोफणे यांची पदोन्नती देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यांची आस्थापन आरोग्य विभाग असणार आहे.
















