- सायरनचा आवाज होताच चोरट्यांचा पोबारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२१) :- चिखली शिवतेजनगरमधील युनियन बॅंकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. बॅंकेच्या नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच नियंत्रण कक्षातून सायरन वाजला. सायरन वाजल्यामुळे चोरट्यांनी पोबारा केला.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून फुटेजच्या आधारे चिखली पोलीस आणि गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. १४) पहाटे घडला. एटीएममध्ये १७ लाखांची रोकड होती. चिखली पोलीस तपास करीत आहेत.












