न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जाने.) :- कुणाल राठी या २२ वर्षीय आंतरराष्ट्रीय फुटबॉलपट्टूने प्रतिभा कॉलेजमध्ये शरीराच्या सर्व अवयवाने फुटबॉल हाताळण्याचे (फ्रीस्टाइल) फुटबॉलचे प्रात्यक्षिके करून दाखवले.
कुणालचे प्रात्यक्षिके पाहून विद्यार्थी थक्क झाले. वेगवेगळ्या बॉल हाताळण्याच्या कलेला विद्यार्थ्यांनी टाळ्यानी दाद दिली. कुणालने मुलाना फ्रीस्टाइल फुटबॉलचे धडे देखील देत दिवसांतून दोन तास खेळासाठी देण्यचा सल्ला दिला.
प्रतिभा कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपक शहा यांनी कुणालचा सत्कार केला. यावेळी कुणालचे वडील दिलीप राठी, प्रतिभा ज्युनियर कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे, प्रतिभा इंस्टिट्यूट ऑफ़ कॉमर्स-कंप्युटर स्टडीजचे संचालक डॉ. आनंद लुंकड, प्रा दर्शन गंधे, प्रा शबाना शेख आदी विद्यार्थी उपस्थित होते. अध्यक्ष डॉ. शहा यांनी खेळात करियर करीत असल्याने कुणालचे कौतुक केले. पालकांनी देखील मुलांच्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्याला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
कुणाल हा २०१७ साली प्राग देशामध्ये झालेल्या वर्ल्ड चॅंपियनशिप तिनशे फुटबॉलपट्टूमधून टॉप ३३ खेळाडूमध्ये झळकला. २०१८ साली झालेल्या प्रागमधील वर्ल्ड चॅंपियनशिपमध्ये टॉप ३० मध्ये झळकला. २०१८ साली व्हिएतनाममध्ये झालेल्या एशियन चॅंपियनशिपमध्ये एकूण ४८ खेळाडूमधून टॉप ८ मध्ये येण्याचा विक्रम केला. सध्या तो पोलंड दौऱ्यावर आहे.















