- ५ जागतिक स्तरावरील ख्यातनाम व्यक्तींना डी. लीट पदवी प्रदान
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चऱ्होली (१९ जाने.) :- अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या (एडीवायपीयू) तिसरा पदवीदान समारंभ अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, चर्होली ब्रु. येथे संपन्न झाला. या भव्य पदवीप्रदान समारंभात जागतिक स्तरावरील ५ प्रसिध्द व्यक्तींना मानवता, शिक्षण, डिझाईन, व्यवस्थापन, समाज आणि व्यवसाय या क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल डॉक्टर ऑफ लेटर्स – होनोरिस कौसा (डी.लीट) ही पदवी देऊन सन्मान करण्यात आला.
त्यामध्ये युनायटेड स्टेटस हाऊस ऑफ रेप्रेंझेटेटिव्हज मधील काँग्रेसमन टॉड रॉकिता, लहान मुलांसाठी कार्य करणार्या समाजसेविका अनिता गरवारे (भारत), शेंकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड डिझाईन-ईस्त्राईलच्या अध्यक्षा युली तामीर, जपान येथील जीके डिझाईन ग्रुपचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी काजूओ तानाका आणि एएनझेड बँकींग ग्रुप लि. चे कार्यकारी संचालक नीरज शहा यांचा समावेश होता.
या पदवीप्रदान समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, राज्याचे माजी उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री राजेश टोपे, बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, फॉग्सीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नंदिता पालशेतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.एकनाथ बी. खेडकर यांनी विद्यापीठाला या वर्षात मिळालेले यश, पुढील योजना व कार्यक्रमांबाबत माहिती देणारा अहवाल सादर केला. ते स्वागत करताना म्हणाले की, आमच्या विद्यापीठाने २० आंतरराष्ट्रीय स्तरीय विद्यापीठाशी सामंजस्य करार केलेत. जगातील २०० विद्यापीठाच्या ऱॅंकिंगमध्ये येण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. पदवी प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले व विद्यापीठाने हाती घेतलेल्या विविध उत्कृष्ट व अभिनव उपक्रमाची माहिती दिली.
याप्रसंगी बोलताना महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील म्हणाले की, ”पदवीदान समारंभ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र पदवीदान म्हणजे शिकण्याला पूर्णविराम नसून एक स्वल्पविराम आहे. ज्यानंतरही आपले शिक्षण सुरूच राहते. बदल हा जगाचा स्थायीभाव आहे आणि या बदलत्या जगात विद्यार्थ्यांनी अभिनवतेची कास धरावी.”
राज्याचे माजी उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री राजेश टोपे म्हणाले की, ”विस्तार सर्वसमावेशकता आणि उत्कृष्टता हे शिक्षणाचे महत्त्वाचे घटक असून उत्कृष्टतेसाठी शिक्षण हे विद्यार्थीकेंद्रित,भविष्यवादी व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक असणे आवश्यक आहे.हे झाल्यास विद्यार्थी रोजगार कार्यक्षम होतील.त्याशिवाय सध्या नैतिकता व मूल्य हे नाहिसे होत असताना विद्यार्थ्यांमध्ये पदवीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांमध्ये या मुल्यांचे शिक्षण देणे आवश्यक आहे.अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने शिक्षणप्रणालीमध्ये अभिनव पध्दती अंगीकृत केल्या आहेत,ही बाब कौतुकास्पद असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. सध्या अभियांत्रिकी क्षेत्रात बेरोजगारी वाढली. मात्र डीवायपाटील कॉलेज अपवाद आहे.”
याप्रसंगी बोलताना अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी वाय पाटील म्हणाले की, ”अजिंक्य डी. वाय. पाटीलची एक वेगळी ओळख असावी, यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. विद्यार्थ्यांच्या मनाची शक्ती ओळखणे, ती वाढवणे आणि उपजीविका कशी कमवावी? या बरोबरच व्यावसायिक वस्तुस्थिती, शैक्षणिक उत्कृष्टता आणि सतत ज्ञान प्राप्त करण्याची उर्मी याबाबत शिकविले जाते व प्रोत्साहन दिले जाते. आमचा उद्देश्य अभिनव पध्दतींद्वारे तंत्रज्ञान आणि अभिनवता या जागतिकीकरणाचे दोन महत्त्वाचे पैलू अंगीकृत करणे आहे.
या पदवीदान समारंभाप्रसंगी व्यवस्थापन, कायदा, डिझाईन, अभियांत्रिकी, मिडिया अॅन्ड कम्युनिकेशन अभ्यासक्रमातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अॅकॅडेमिक एक्सलन्सकरिता सुवर्ण पदक विजेत्यांची यादी :
१ ) रूचिका शर्मा – मास्टर ऑफ लॉ २) अंकीत सोनी – मास्टर ऑफ डिझाईन (ऑटोमोबाईल डिझाईन), ३) नुपूर शर्मा – मास्टर ऑफ टेक्नोलॉजी (डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग), ४) आदित्य लीलाधर तालेले – मास्टर ऑफ टेक्नोलॉजी (ऑटोमोटिव्ह प्रॉड इंजिनिअरिंग), ५) आकृती अगरवाल – बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन ( मिडिया अॅन्ड कम्युनिकेशन), ६) सोनाक्षी उपाध्याय – मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (मिडिया अॅन्ड कम्युनिकेशन), ७) चिराग उप्पाल – मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बिझनेस इनोव्हेशन अॅन्ड स्ट्रॅटेजी), ८) शीतल दादस – मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स), ९) नलिनी सिंग-मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (ह्युमन रिर्सोस), १०) आशना टंडन – मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (डिजिटल मार्केटिंग अॅन्ड ई-कॉमर्स), ११) रोहित अलगुडे – मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन( बिझनेस अॅनालिटिक्स), १२) अभिमन्यू चौहान-मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बँकींग अॅन्ड फायनान्शियल सर्व्हिसेस), १३) गौरव गरवाल – पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल मॉडेलिंग, १४) द्रोणा पांचाल – बॅचलर्स ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन इंटरनॅशनल बिझनेस, १५) रोशनी जगताप – बॅचलर्स ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स इन मोबाईल अॅप्लीकेशन अॅन्ड क्लाऊड टेक्नोलॉजी