सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील उद्योजक डी.एस. कुलकर्णी यांच्यावरील धडा वगळण्यात आला आहे. विद्यापीठाने परिपत्रक काढून याबद्दलची माहिती दिली. वाणिज्य शाखेतील पहिल्या आणि तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमातून डीएस कुलकर्णी यांच्या कारकिर्दीवर आधारित धडा होता. यशोगाथा या पुस्तकात डीएसकेंवर एक प्रकरण आहे. या प्रकरणात डीएसकेंचा संघर्ष, यश, प्रेरणा याचा समावेश आहे.
पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमातून डीएसकेंचा धडा वगळला
















