- पिंपरी चिंचवड वकील संघटनेकडून देखील सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर यांनी वाढदिवसानिमित्त चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम संस्थेस भेट दिली. यावेळी अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. सतीश गोरडे यांनी त्यांना गुरुकुलम या संस्थेविषयी माहिती दिली. संस्थेचे कार्यवाह गिरीश प्रभुणे सर यांचे अॅड. पुणेकर यांनी आशीर्वाद घेतले. अॅड. पुणेकर यांनी गुरुकुलममध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली.
याप्रसंगी अॅड. पुणेकर म्हणाले, ” पुनरुत्थान समरसता गुरुकुलममध्ये येण्याची मला संधी मिळाली, हे मी माझं भाग्यच समजतो. चिंचवडगावातील गुरुकुलची वस्ती शाळा एकदा तरी भेट देऊन पाहण्यासारखी आहे. सोबत प्रभुणे सर असतील तर आपण भारावून गेल्याशिवाय राहणार नाही.” गुरुकुलम संस्थेतर्फे अॅड. पुणेकर यांना शाल, श्रीफळ देऊन व गुरुकुलम प्रकाशन, चिंचवड यांचे समसतेचा वाटसरू हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
अॅड. पुणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या कार्यकारिणीनेदेखील कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अॅड. जिजाबा काळभोर यांनी पुणेकर हे अध्यक्षपदी असतानाचा वकिलांकरिताचा व न्यायालयाकरिता केलेल्या कामांचा आढावा सांगितला. नोटरी असो.चे अध्यक्ष अॅड. अतिश लांडगे यांनी देखील जुन्या आठवणींना उजाळा देऊन अॅड. पुणेकर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष सचिन थोपटे व कार्यकारिणीने पुणेकर यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले.
कार्यक्रमास मा. उपाध्यक्ष अॅड. योगेश थंबा, अॅड. दिनकर लाळगे पाटील सर, अॅड. मंगेश खराबे व अन्य वकील बांधव उपस्थित होते. अॅड. पुणेकर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पिं.चिं. अॅड. बार असोसिएशनचे सचिव अॅड. निखील बोडके यांनी केले.
















