न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २८ जाने.) :- आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, चिखली येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधिकारी भरत चापाइतकर, मधुसूदन घुगे, संदीप बागुल, योगेश शिंदे, नगरसेविका साधना मळेकर, स्विनल म्हेत्रे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक कुंदन गायकवाड, विनायक मोरे, आयआयबीएम ग्रुपचे संस्थापक धनंजय वर्णेकर, आयआयबीएम कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत, मनिष निजामपूरकर, क्रीडा प्रशिक्षक प्रतीक्षा डफळ, प्राध्यापक आदित्य वर्तक, ओंकार वाटवे, रीमा चक्रवर्ती, डॉ. तेजस्विनी गायकवाड, सागर पाटील, संतोष घाडगे, अतुल पुंडे, आयआयबीएम कॉलेजचे सर्व विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते.
पोलीस उपनिरीक्षक संदीप बागुल यांनी देशाचे संविधान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलीस उपनिरीक्षक भरत चपाइतकर यांनी सायबर क्राइम, व्हाटसअप, फेसबुक, टिकटॉक या माध्यमातून होणारे गुन्हे व त्यापासून आपण कसे सतर्क राहिले पाहिजे? याबाबत माहिती दिली.
आयआयबीएम कॉलेजचे संस्थापक धनंजय वर्णेकर यांनी विद्यार्थ्यांना कायद्याबाबत, वाहतूक नियमांबाबत तसेच आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ कसा राहील? व त्याबाबत विद्यार्थ्यांनी नियम व अटी स्वतःवर लादून तसे वर्तन केले पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले. अमोल भागवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यानी डिजिटल इंडिया या संकल्पनेद्वारा जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहार करावेत. मुलांनी केवळ अभ्यासू वृत्ती न जपता क्रीडा क्षेत्राकडेही लक्ष द्यावे व खेळांच्या माध्यमातून देशाचे नाव उंचवावे.
क्रीडा शिक्षिका प्रतीक्षा डफळ यांनी कराटेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्व-संरक्षणाचे धडे दिले. तसेच देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रमही घेण्यात आला. यावेळी विविध क्रीडाप्रकारात विशेष प्राविण्य मिळवलेल्या कॉलेजच्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश आढळराव याने तर नियोजन अनिकेत वंजारी याने केले. आभार प्रदर्शन प्राध्यापिका रीप्सी हाकिम यांनी केले.











