न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ फेब्रु.) :- शिवशाही व्यापारी संघाच्या महाराष्ट्र प्रभारी महिला उपाध्यक्षपदी भाग्यश्री म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवार (दि. २) रोजी त्यांना निवडीचे नियुक्तीपञक अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिध्दीक शेख यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी प्रदेश सचिव गणेश आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत या निवडीची घोषणा केली. यावेळी उपाध्यक्ष गोरख पाटील, बाळासाहेब गायकवाड, मारूती म्हस्के, रविकिरण घटकार आदी शिवशाही व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.











