न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ फेब्रु.) :- रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये रमाबाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
रमाबाई यांच्या प्रतिमेस हेमा शेलार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, शाळेच्या मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाभिष, मंजुळा मुदलियार, सामाजिक कार्यकरते तात्या शिनगारे, राजेश सुटे, राकेश भास्कर, रहीम शेख तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. त्याच बरोबर शाळेतील शिक्षकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
संस्थापक अरुण चाबुकस्वार म्हणाले की, “करुणेचा महासागर, मातृत्वाचे महाकाव्य महासूर्याची सावली, कोटयावधींची माऊली, बाबासाहेबांची ऊर्जायनी, रामू, रमा, रमाई रंजल्या-गांजल्यांची दीन-दलितांची आई मातारमाई ह्यांनी अनेक हाल अपेष्टा, उपासमार सहन करून, कोणत्याही भौतिक सुखाचा हव्यास न धरता त्या अशिक्षित मातेने बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेले.
बाबासाहेबांची समाजाप्रती तळमळ पाहुन त्यांच्यामागे खंबीरपणे उभ्या राहिल्या, ही जाणीव प्रत्येकामध्ये असली पाहिजे तसेच मातोश्री रमाबाईची सहनशीलता, सोज्वळता त्यागी व वात्सल्यवृत्ती, कष्ट, कामसू निर्मळपणा, स्वाभिमानी इ. गुणांचा आदर करून हे गुण आपल्या अंगी बाळगले पाहिजेत. त्याचप्रमाणे कठीण परीस्थितीवर मात करून कसे जीवन जगावे आणि फक्त जीवन जगणे नाही तर ते आनंदाने व समाधानाने कसे जगावे हा आर्दश घेतला पाहिजे.”
प्रियंका लाडे हयांनी सूत्रसंचालन केले व रेणू राठी यांनी पाहुण्याचे आभार मानले.











