न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२२) :- मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. ही मोकाट कुत्री पकडण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह माजी नगरसेवक वारंवार महापालिका प्रशासनाकडे करत आहेत. त्यामुळे पालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाच्या वतीने येत्या पंधरा दिवसांत मोकाट कुत्री पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
शहरातील मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे. कुत्र्यांनी लहान मुले, ज्येष्ठांवर हल्ला केल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या पाहता विशेष मोहीम राबविणे गरजेचे आहे. त्यामुळे पालिकेने कॅनायन केअर अॅण्ड कंट्रोल या संस्थेला मोकाट कुत्री पकडण्याचे काम देण्याचे ठरविले आहे. यासाठी कराराची प्रक्रिया सुरू असून ही संस्था मोफत कुत्री पकडणार आहे.
मोकाट कुत्र्यांच्या तक्रारी येत आहेत. त्यानुसार पशू वैद्यकीय विभागामार्फत ५ ते ६ कुत्री दररोज पकडली जात आहेत. मात्र, कुत्र्यांची संख्या आणि तक्रारी पाहता येत्या १५ दिवसांत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पकडलेल्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा सोडण्यात येणार आहे.
– अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी…