- सौ. अनिताताई संदीप काटे आणि निलेश काटे युवा मंचचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२२) :- शहरातील विविध रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने पिंपळे सौदागर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्योजक संदीप काटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हे रक्तदान शिबीर बुधवारी (दि. २५) रोजी सकाळी ९.०० वा. पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या आवारात संपन्न होणार आहे.
या रक्तदान शिबिरात रक्तदान करून राष्ट्रहिताच्या कार्यात व गरीब, गरजू यांना रक्ताची कमतरता भासू नये म्हणून रक्दातत्यांनी ”रक्तदान हेच जीवनदान” या भावनेतून रक्तदान करून दिनदुबळयांचे प्राण वाचवुन समाजाप्रति निष्ठा राखावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनिताताई संदीप काटे आणि निलेश काटे युवा मंचच्या वतीने परिसरातील नागरिकांना केले आहे.