- चिखलीत व्यवसायिकाला शिवीगाळ अनं धमकी; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२२) :- चहाच्या टपरीवर फिर्यादी आणि त्यांचा मुलगा थांबले असताना आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाला फोन केला. फोनवरून शिवीगाळ, दमदाटी करत बोलावून घेतले आणि ‘ मला दर महिन्याला हप्ता दिला नाही तर इथून तुमची एकही ट्रॅव्हल्स गाडी जाऊ देणार नाही ‘ अशी धमकी दिली.
फिर्यादीचा ट्रॅव्हल्स बुकिंगचा व्यवसाय आहे. फिर्यादी यांच्या मुलाला आरोपीने बाजूला नेऊन त्याच्या कमरेला हात लावला. ‘ माझ्या जवळ पिस्तुल आहे. हप्ता दिला नाही तर मर्डर करून टाकेन अशी आरोपीने धमकी दिली.
हा प्रकार एप्रिल २०२२ मध्ये कृष्णानगर भाजी मंडई चौक आणि १५ मे २०२२ रोजी कृष्णानगर चौकात घडला. राजू विलास बिराजदार (वय ५०, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) यांनी सोमवारी (दि. २३) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनुप लांबट (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.