न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२२) :- तळवडेकडून चाकणकडे जाणाऱ्या पुलावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी फिर्यादीला अडवले. फिर्यादी हे शनिवारी (दि. ४) साडेबाराच्या सुमारास रूमवर जात होते.
चाकणला जाणारा रस्ता कोणता आहे? असे विचारून एका आरोपीने फिर्यादीला दगड मारण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्याने फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार करून पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावला. त्यानंतर आरोपी पसार झाले. याप्रकरणी शुभम ऋषिकेश राऊत (रा. तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.