- पोलिसांकडून चार पिडीत मुलींची सुटका; ऐवज जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२२) :- जबरदस्तीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पिडीत मुलींकडुन वेश्या व्यवसाय करवुन घेणाऱ्या दलालांवर पोलिसांच्या पिंपरी चिंचवड अनैतिक मानवी वाहतुक विभागाने शुक्रवार (दि. ३) रोजी कारवाई केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीसांनी केलेल्या या कारवाईत ०४ पिडीत मुलींची सुटका केली असुन दलांला विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मुख्य आरोपी विजय साहेबराव थोरात (वय ३१ वर्षे, मानस हेरिटेज, ए विंग, फ्लॅट नं.६०२, बालेवाडी, पुणे, मूळ रा. ता. राहुरी, जि. मुळपत्ता – माळरान, चिंचोली फाटा, ता. राहुरी , जि. अहमदनगर), त्याचे साथीदार राज उर्फ भागवत मुंडरे (रा. लातूर), नीलेश मारवाडी उर्फ राजु (रा. बाणेर), युसुफ सरदार शेख (रा. तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल झालेल्या दलालांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार अनैतिक मानवी वाहतुक विभागाचे पथकाला हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुप्रसिद्ध लॉजवर काही दलाल मंडळी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पिडीत मुलींकडुन जबरदस्तीने तसेच पैशाचे आमिष दाखवुन वेश्या व्यवसायास भाग पाडत आहेत असल्याची माहिती मिळाली. ही दलाल मंडळी त्यांच्या मोबाईल वरून व्हॉटस्अप करून वेगवेगळ्या लॉजवर मुली पाठवुन वेश्या व्यवसाय करवुन घेत होते. या पिडीत मुलींमध्ये दोन मुली पश्चिम बंगाल, एक मुलगी उत्तरप्रदेश आणि एक मुलगी हरीयाणा राज्यातील आहे. मुख्य आरोपी मुलींच्या वेश्या व्यवसायातून मिळविलेली रक्कम घेण्यासाठी आला असता पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा रचुन त्याला ताब्यात घेतले आहे. ४ हजार रोख रकम, ३५ हजाराचे दोन मोबाईल फोन, ४० रुपयांचे इतर साहित्य असा एकूण ३९ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.