न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२२) :- ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रभाग क्रमांक १३ सेक्टर २२ मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात पंचवीस झाडे लावण्यात आले. वड, पिंपळ, नारळ, चिंच, व विविध फुलांचे झाडे लावण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अमोल गोरखे, वृक्ष प्राधिकरणाचे सगरे, जनवाणीची संपूर्ण टीम, मामू, फारुख भाई, माजी नगरसेवक तानाजी खाडे, रशिद सिद्दिकी, नियाज खान, गणेश वाघमारे, बबलू सिंग पोथीवाला, माजी नगरसेवक श्याम पवार, सुलतान तांबोळी, अल्ताफ शेख, प्रभागातील महिला बचत गट, प्रगती महिला बचत गट, श्री समर्थ महिला बचत गट, स्व विकास महिला बचत गट आदी उपस्थित होते. प्रभागातील सर्व जेष्ठ नागरिकांनी वृक्षारोपणासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती, अशी माहिती मनसेचे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी दिली.