- शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी; राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, निंबाळकर विजयी..
- काँग्रेसचे भाई जगताप विजयी, चंद्रकांत हंडोरे पराभूत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२२) :- विधान परिषदेच्या दहा जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीत एकूण २८५ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. भाजपचे चार, शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. नवव्या आणि दहाव्या जागेवरचा कॉंग्रेसच्या निकालाचा सस्पेन्स अद्याप कायम आहे
भाजपनं या निवडणुकीत ५ जणांना उमेदवारी दिली होती. त्यात भाजपचे प्रविण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय विजयी झाले आहेत. तर प्रसाद लाड यांचा निकाल वेटिंगवर आहे.
शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी हे विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर विजयी झाले आहेत.
काँग्रेसकडून भाई जगताप विजयी झाले आहेत तर चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत.
भाजपचे राम शिंदे यांना ३०, श्रीकांत भारतीय ३०, प्रवीण दरेकर यांना २९, उमा खापरे यांना २७, प्रसाद लाड यांना २८ मते मिळाली आहेत. शिवसेनेचे सचिन अहिर यांना २६ तर आमश्या पाडवी यांना २६ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांना २९ आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना २८ मते मिळाली आहेत. कॉंग्रेसचे भाई जगताप यांना २६ मते मिळाली आहेत.
शिवसेनेला ५५ पैकी ५२ मते, भाजपला १३३ मते मिळाली आहेत. त्यांना २७ मते अधिकची मिळाली आहेत. राष्ट्रवादीला ५१ पैकी ५७ मते मिळाली. कॉंग्रेसला ४४ पैकी ४१ मते मिळाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
दरम्यान भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. याबाबतची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. दोन तासानंतर निवडणूक आयोगाने काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली होती.
दरम्यान विधानपरिषदेच्या मतमोजणीमध्ये दोन्ही बाजूंना धक्का बसला होता. राष्ट्रवादीच्या रामराजेंच्या कोट्यातील एक मत तर भाजपच्या उमा खापरेंच्या कोट्यातील एक मत बाद करण्यात आलं होत. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या कोट्यासाठी २५.७१ चा नवा कोटा ठवण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या कोट्यातील बाद ठरवण्यात आलेल्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती.