न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. १५ फेब्रु.) :- येथील सीएमएस इंग्लिश मिडियम हायर सेकंडरी स्कूलमध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले. बालवर्ग ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
यावेळी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके, प्रतिभा इंस्टीट्यूटचे अध्यक्ष डॉ. दीपक शहा, सीएमएसचे अध्यक्ष पी. व्ही. भास्करन, सरचिटणीस टी.पी. विजयन, उपाध्यक्ष के. रघुनाथन, खजिनदार के. व्ही. जनार्दनन, पी. श्रीनिवासन, पी. अजयकुमार, व्ही. के. रामकृष्णन, मुख्याध्यापिका बी. जी. गोपकुमार, चैताली लोंढे, मंजू थंपी, निशा सुनीलकुमार आदी उपस्थित होते
यावेळी खडके यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला. डॉ शहा यांनी शैक्षणिक उपक्रमासोबतच इतर उपक्रम राबविले पाहिजेत, असे मत व्यक्त केले.
मुख्याध्यापिका बी. जी. गोपकुमार यांनी स्वागत, तर चैताली लोंढे यांनी वार्षिक अहवाल सादर केला.


















