न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रु.) :- ज्ञान हे यश मिळविण्याचे साधन आहे. अनेक घटकांनी समाज बनतो. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी केला पाहिजे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स आणि टेकनॉलॉजीचे प्रमुख डॉ. ए. डी. शाळिग्राम यांनी केले.
ताथवडे येथील जेएसपीएम राजर्षी शाहु अभियांत्रिकी महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभियांत्रिकी पदवी प्रदान समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी शिक्षण कसे असावे? हे समजावून सांगितले. परिपूर्ण शिक्षणाचे तीन लक्षण आहेत ते म्हणजे ज्ञानाचा संग्रह, आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करून दाखविणे आणि संकटांचा सामना करावयास शिकविते. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. जैन यांनी सांगितले महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगती सांगितली. यावर्षी पासुन राजर्षी शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयाला पुणे विद्यापीठाने शैक्षणिक स्वतंत्रता दिली आहे. त्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम महाविद्यालय स्वतःच तयार करू शकेल आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यापीठ पदवी प्रदान करेल.
जेएसपीएम राजर्षी शाहु अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी प्रदान करण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. पदवी प्रदान कार्यक्रमात २०१७-१८ या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी’ महाविद्यालय स्तरावर पदवी प्रदान करण्यात आली. त्या अनुसंघाने या कार्याक्रमचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमासाठी संस्थेचे इतर मान्यवर प्राचार्य डॉ. आर. के. जैन, ताथवडे संकुल संचालक, उपप्राचार्य प्रा. ए. एस. देवस्थळी, कार्यकारी संचालक प्रा. सुधीर भिलारे, संकुल उपप्रमुख रवी सावंत, महाविद्यालयाचे मुख्य परीक्षा अधिकारी प्रा. विक्रम महाजन या प्रसंगी उपस्थित होते.
या कार्यक्रमास सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने हजेरी लाऊन आपली पदवी घेतली. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा एक संस्मरणीय दिवस झाला. सर्व पदवी प्राप्त विद्यार्थी आनंदीत होऊन मित्रांबरोबर फोटोसेशन करून घेत या आठवणी साठवून ठेवत होते.
या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक सचिव आमदार डॉ. टी. जे. सावंत यांचे प्रोहत्सान आणि अमुल्य मार्गदर्शन लाभले. प्रा. रवी टक्के यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंबरीश क्षीरसागर यांनी केले.


















