न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १५ फेब्रु.) :- चिंचवडगावचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे महासाधू श्री. मोरया गोसावी यांची अनेक वर्ष माघी पालखी चिंचवड ते मोरगाव आशी जाते. यंदाही चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने माघी पालखी चिंचवड मोरगावकडे प्रस्थान झाली. यात अनेक मोरया भक्त सहभागी झाले होते.
परंतु, शनिवार (दि. ७) रोजी जेजुरीहून मोरगावकडे पालखी जात असताना सायंकाळी सातच्या सुमारास पायी चालणाऱ्या दोन मोरया भक्तांना एका दुचाकी वाहनाने मोरगाव रस्त्याजवळील ढोले मळा येथे जोरदार धडक दिली असून, मोरया भक्त शरद पुराणिक व मिलिंद पोफळे हे जखमी झाले. त्यापैकी शरद पुराणिक यांच्या डोक्याला जबर मार लागला असून, पुणे येथील खाजगी रुग्णालय येथे त्याच्यावर मेंदूवर शत्रक्रिया करण्यात आली. आता अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
या अपघातामध्ये त्यांच्या मेंदूस जबर दुखापत झाली असून, यावरील सर्व खर्च त्यांचे नातेवाईक करीत आहेत, सध्याचा तेथील खर्च हा नातेवाईकांनासुद्धा परिस्थितीनुसार पेलवण्याबाहेरचा आहे. तरी ज्या भाविक व गणेशभक्तांना शक्य असेल, त्यांनी योगेश पुराणिक : ९८२२६९७७८१ यांच्या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











