न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रु.) :- राज्य सब- ज्युनियर थ्रो – बॉल स्पर्धेसाठी चिंचवड मधील सेंड ॲड्र्ज शाळेच्या मृणाल नरेंद्र लांडगे हीची पुण्याच्या ज्युनियर गटाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. शनिवारी (दि. १६) रोजी रत्नागिरी येथे थ्रो – बॉलच्या राज्य स्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्हा संघाचे नेतृत्व करण्याची संधी पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडच्या खेळाडूला मृणाल लांडगेच्या रुपात मिळाली आहे. प्रशिक्षक राजेंद्र मागाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंड ॲन्ड्रुज शाळेच्या आरुषा गाडे, श्रेया सोमाणी, तनिष्का पाटील, अबोली बोंबले, समृध्दी मोरे यांचीही राज्य सब- ज्युनियर थ्रो – बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे











