- प्रमुख पदाधिकाऱ्यांची पक्षाच्या बैठकीला दांडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०२२) :-पिंपरी चिंचवड विधानसभेतील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी अंगीकृत संघटनेच्या सर्व आजी – माजी पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक आकुर्डीतील शिवसेना भवनात रविवारी झाली.
शिवसेनेच्या बैठकीस महिला संघटिका सुलभा उबाळे, महापालिकेतील माजी गटनेते राहुल कलाटे यांच्यासह शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची अनुपस्थिती होती. विधानसभेतील पदाधिकारीही बैठकीस अनुपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेत गटबाजीचे दर्शन घडले.
शहरातील प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. आमच्यासाठी मातोश्री हेच श्रद्धास्थान असल्याचे प्रतिपादन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
मेळाव्यास शहर प्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबूकस्वार, शहर संघटिका उर्मिला काळभोर, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, संपर्कप्रमुख वैभव थोरात आदी उपस्थित होते.