- पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचे फर्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जुलै २०२२) :- पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक बेधडक निर्णय घेतले आहेत. कर्तव्यात कसूर करणारे, अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणारे, अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेले अधिकारी, कर्मचारी पोलिस आयुक्तांच्या निशाण्यावर आहेत. मोठ्या प्रमाणात पोलिस निरीक्षकांच्या बदल्याही केल्या आहेत.
दरम्यान गुरुवारी (दि. ७) आयुक्तांनी म्हाळुंगे चौकीचे सहायक निरीक्षक दत्तात्रेय गुळींग यांना पिंपरी पोलिस ठाण्याशी तर याच चौकीचे सहायक निरीक्षक सुरेश निवृत्ती यमगर यांना पोलिस नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे.
तसेच म्हाळुंगे चौकीतील हवालदार अमोल बाळासाहेब बोराटे व शिपाई शरद शांताराम खैरे यांना पोलिस मुख्यालयाशी तर अंमली पदार्थ विरोधी पथकातील शिपाई विजय दीपक दौंडकर यांनाही मुख्यालयाशी संलग्न केले आहे.