- राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२२) :- महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाकड, काळाखडक भागातील आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना आज स्मार्टकार्डचे वाटप करण्यात आले.
आयुष्यमान भारत योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना आरोग्य विमा प्रदान करणारी योजना आहे. त्याखालील प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाखापर्यंत कॅशलेस विमा उपलब्ध होईल. याचा अर्थ असा की या योजनेत पात्र असणारी कोणतीही लाभार्थी व्यक्ती खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर म्हणाले, वाकड, काळाखडक भागातील लोकांपर्यंत ही योजना राबवू शकलो. आज त्यांना प्रत्यक्ष स्मार्ट कार्ड सुपूर्त करून ही योजना पूर्णत्वास नेऊ शकलो. आगामी काळातही शासनाच्या अनेक लाभदायी योजना राबवून लोकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असेन.
स्मार्ट कार्ड वाटप प्रसंगी रमजान सय्यद सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड, युवा उद्योजक अविनाश वाकडकर, बाळासाहेब वाकडकर, गोविंद जाधव तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














