न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (९ ऑगस्ट २०२२) :- रोशनबार येथे फिर्यादी महिला चायनीज खात असताना एका मुलाच्या हातुन ग्लास सांडला. मात्र वेटरला तो ग्लास फिर्यादी यांनी सांडवला असे वाटले. म्हणून त्याने त्याच्या मालकाला सांगितले. त्याने रागाच्या भरात फिर्यादी यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत सेंटरमधून बाहेर काढले. फिर्यादी स्पाईन रोडने घरकूलकडे जाणाऱ्या ब्रीजवर रडत थांबल्या होत्या.
त्यावेळी आरोपी तेथे आला व त्याने फिर्यादी यांना पुन्हा मारहाण करत त्यांना थेट पूलावरून ढकलून दिले. यामध्ये फिर्यादी यांच्या पाठीला, कंबरेला व दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
हा प्रकार चिखलीत १५ जुलैला घडला. सोमवारी (दि. ८) चिखली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस ठाण्यात सोहेल (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.