- ‘ हर घर तिरंगा ‘ मोहिमेंतर्गत घरोघरी मोफत तिरंग्याचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२२) :- भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त आमदार श्री महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनखाली प्रभागात हर घर तिरंगा या मोहिम राबविण्यात येत आहे.
त्यानुसार कुदळवाडीतील स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या बीआरटी रस्ता, राॅयल प्लाझा सोसायटी येथील जनसंपर्क कार्यालयात मोफत तिरंग्याचे वाटप सुरु आहे.
येत्या १३ ते १५ ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा फडकावून या देशव्यापी मोहिमेत सहभागी व्हा आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करा, असे आवाहन स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी नागरिकांना केले आहे.