- न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. १८ फेब्रु.) :- रहाटणीतील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार ह्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापिका श्राबनी पत्रानाभिश, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कांबळे, आनंद शिंदे, संतोष लोलगे उपस्थित होते. शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूवर आपले मनोगत व्यक्त केले. प्रज्ञा, शील, करुणा चैतन्य, शूरत्व, स्वाभिमान, संयम, समयसूचकता अशा निपूण बाबींवर प्रकाश टाकला. शिवरायांचे चारित्र्य स्वच्छ आणि तेजस्वी होते. त्यामुळेच राजांबद्दल शत्रूना व त्यांच्या स्त्रियांना देखील आदर वाटायचा.
संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सध्या शेकडो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. छत्रपतींचे स्वराज्य म्हणजे जगातील पहिले लोकशाही राज्य होय. राजा व त्यांचे मंत्रिमंडळ हे रयतेचे सेवक आहेत. हे जगात प्रथम शिवरायांनी मांडले व अमलात आणले. त्यामुळेच रयतेच्या भाजीच्या देठाला व गवताच्या काडीलाही इजा पोहचविणाऱ्या राज्यसेवकास सजा होत असे. जगातील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर शिवचरीत्रात सापडते, म्हणून ‘शिवचरित्र’ हे वर्तमानात सर्वासाठीच प्रेरणादायी आहे.
शिप्रा हाजेला यांनी सूत्रसंचालन व आभार मानले .











