न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२२) :- शहर पोलीस दलात पाच निरीक्षकांसह १२ पोलीस अधिकाऱ्यांच्या आयुक्तालयांतर्गत बदल्या झाल्या आहेत. पिंपरी – चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुरुवारी (दि. १८) याबाबतचे आदेश दिले.
बदली झालेले पोलीस निरीक्षक सुनील गोडसे (चाकण वाहतूक विभाग ते आळंदी पोलीस ठाणे), शिवाजी गवारे (भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे ते रावेत पोलीस ठाणे), शैलेश गायकवाड (आरसीपी ते चाकण वाहतूक विभाग), राजेंद्र निकाळजे (शस्त्र विरोधी पथक ते भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे, व्दितीय) यांची बदली करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम हे भोसरी पोलीस ठाणे येथे नियुक्त असताना त्यांना क्यूआरटी पथकाशी संलग्न केले होते. त्यांची दिघी येथे बदली झाली. पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे (भोसरी पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा), तसेच आळंदी पोलीस ठाण्यात नियुक्तीला असताना हिंजवडी पोलीस ठाण्याशी संलग्न केलेले सहायक निरीक्षक नकुल न्यामने यांची चिखली पोलीस येथे बदली करण्यात आली. बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक महेश मतकर, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा), कृष्णा सपकाळ, नियंत्रण कक्ष ते आर्थिक गुन्हे शाखा, नवनाथ कुदळे चिचवड पोलीस ठाणे ते चिखली पोलीस ठाणे, सचिन देशमुख चिखली पोलीस ठाणे आरसीपी, राजू मोरे दिघी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष यांची बदली करण्यात आली आहे.