- स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांची जनसंवाद सभेत मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२२) :- प्रभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी, वीज, ड्रेनेज समस्या तसेच आरोग्य विषयक तक्रारी लवकरात लवकर सोडवा, अशी मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी आज सोमवारी क प्रभाग जनसंवाद सभेत प्रशासनाकडे केली.
त्याचप्रमाणे कुदळवाडी ते मोरे पाटील चौक रस्ता दुरुस्ती, कुदळवाडी पोलीस चौकी समोरील रस्त्यावरील खड्डे, भैरवनाथ मंदिरासमोरील पाणी समस्या, आदेश पेट्रोल पंप समोरील ड्रेनेज दुरुस्ती, परिसरातील पेंव्हीग ब्लॉक दुरुस्तीची कामे तत्काळ करा, अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली.
सर्व समस्या आणि तक्रारींचे लवकरात लवकर निराकरण केले जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिनेश यादव यांना दिले. यावेळी लहुउद्योजक संघटनेचे सचिव नवनाथ वायाळ उपस्थित होते.















