न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रु.) :- समाजवादी पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज शुक्रवार (दि. २२) रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवनकार्य संघर्षाची समाजवादी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रफीकभाई कुरेशी यांनी माहिती सांगितली. यावेळी समाजवादी पार्टी पिंपरी चिंचवड शहर महासचिव मोहसीन शाह, शहर उपाध्यक्ष सालारभाई शेख, शहर महिला अध्यक्षा वाहीदा शेख व समाजवादी कार्यकर्ते उपस्थित होते











