न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिपरी:- अनेक वर्षानंतर मनसे उपशहरप्रमुख अंकुश तापकीर यांच्या मागणीला यश आले असून समाविष्ट भागातील रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील चऱ्होली, वडमुखवाडी, दत्तनगर काळीभींत हा परिसर गेली अनेक वर्षांपासून महापालिकेत समाविष्ट झाला असूनही महापालिकेच्या वतीने कुठलीही विकासकामे झाली नाहीत. तसेच शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे शहराबाहेरील अनेक नागरिक समाविष्ट भागात वास्तव्यास आली असून रस्ता अपुरा व व्यवस्थित नसल्यामुळे रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे गावातील नागरिकांची गैरसोय होत होती.
तापकीर म्हणाले समस्या जास्तच उग्र होत आहे हे पाहून सर्वप्रथम गावातील शेतकऱ्यांची मोट बांधली व रस्त्याची निकड त्यांना समजावून सांगितली. अल्पावधीतच सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून सर्व कागदपत्रांची जमवाजमव करून शासनदरबारी रस्त्यासाठी पाठपुरावा चालू केला. याकामी गावातील शेतकऱ्यांच्या मदतीने या परीसरातील सर्वात मोठे क्षेत्र रस्त्याकरीता शासनास उपलब्ध करून दिले.
मा. महापौर नितीन काळजे यांनी याकामी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या परिसरात १८ मिटर रस्त्याचे काम मंजूर होऊन पूर्णत्वास येत आहे.
विकासासाठी गावातील नागरिकांनी जमिनी देऊन या रस्त्याचा मार्ग मोकळा केला. गावकऱ्यांच्या वतीने संतोष तापकीर, विष्णूजी तापकीर व गावातील शेतकऱ्यांच्या सहभागाने या परिसरात पहिले-वाहिले विकासकाम सुरु झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे असे अंकुश तापकीर यांनी सांगितले.
















