न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२२) :- प्लायवुड व कटर मशिनची रहाटणीतील डिझायन प्लाय नावाच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात फिर्यादीने केली होती. या दुकानातूनच जून महिन्यात फेव्हिकॉलचे १५ ड्रम चोरी केल्याचा गुन्हा दाखल होता. या घटनेची दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी तात्काळ अज्ञात आरोपी व मालाचा शोध घेण्याबाबत पोलिसांना आदेश दिले होते.
पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी (दि. ११) रोजी फर्निचर दुकानातून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे आधी चौकशी केली असता दोन्ही गुन्हे त्याने केल्याचे कबूल केले. कलीमुल्लाह ऊर्फ सदाम हाफीझुल्ला खान (वय २५ वर्षे, रा. फ्लॅट नं. ६०८, गुसरा टॉवर, साईबाबा नगर, कोंढवा, मुळगाव अलावर देवरिया, ता. धानेपुर, जिल्हा गोडा, राज्य उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून प्लायवुड व कटर मशीन आणि फेव्हिकॉलचे ड्रम असा एकुण २,०८,७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई अंकुश शिंदे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, संजय शिंदे सो अपर पोलीस आयुक्त, काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, श्रीकांत दिसले सहा पोलीस आयुक्त, वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, वाकड पोलीस ठाणे, रामचंद्र घाडगे, संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, सपोनि संभाजी जाधव, पोलीस अमलदार विभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे व गिरे, स्वप्नील खेतले, दिपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, विक्रांत चव्हाण, अलिक शेख, तात्यासाहेब शिंदे, कौलेय खराडे, अजय फल्ले, भास्कर भारती यांनी मिळून केली आहे.
















