- पिंपळे सौदागर येथील मटण खानावळीत तिघांना मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२२) :- पिंपळे सौदागर येथे एक मटण खानावळ आहे. तिथे आरोपी आणि त्याचा मित्र हे नेहमी जेवायला जायचे. परंतु, मंगळवारी मटणाच्या सूपमध्ये भात आला, यावरून आरोपी आणि त्याच्या साथीदाराने वेटर तिघांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
हॉटेलची सर्व्हिस चांगली नाही. जेवण ही चांगले देत नाही म्हणत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यात वेटरचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. मंगेश संजय पोस्ते (वय १९) असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे. तर, अजित अमूत मुठकुळे (वय ३२), सचिन सुभाष भवर (वय २२) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत.
विजयराज वाघिरे आणि त्याच्या साथीदारावर सांगवी पोलीस ठाण्यात खुना प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल महादू रजाळे यांनी सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे. सांगवी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
















