न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रु.) :- महाबळेश्वर येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब संस्थेच्या द्वितीय अधिवेशनात सन २०१९-२० या वर्षा साठी प्रांतपाल म्हणून ओमप्रकाश पेठे यांची निवड झाली. तसेच प्रथम प्रांतपालपदी सीए अभय शास्त्री व द्वितीय प्रांतपाल पदी हेमंत नाईक यांची निवड करण्यात आली.
प्रांतपाल पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर पेठे यानी त्यांच्या येणाऱ्या कार्यकालासाठी कार्यकारिणीची निवड केली, त्यात मुख्य कार्यकारी संचालक विनय सातपुते, प्रान्त सचिव शशी कदम, प्रांत खजिनदार किशोर गोडसे व प्रांताचे जनसंपर्क अधिकारी म्हणून सुनिल जाधव, तसेच जीएसटी प्रमुख योगेश कदम, जीएमटी प्रमुख राजेश कोठावदे, जीएलटी प्रमुख परमानंद शर्मा, एलसीआयएफ समन्वयक प्रवीण गुलाटी, एडिटर निलिमा जाधव, पर्मनंट प्रोजेक्ट प्रमुख संजय निम्बालकर, डी सी पब्लिकेशन राजेश शर्मा, डी सी डीजी विजिट त्यागराजन, डी सी क्लब फायनांस विष्णुदास बांगड़, डी सी क्लब स्पेशालिटी
राजेश मेहता, डी सी सिग्निचर एक्टिविटी महेश पोफले, डी सी सर्विस विथ सेलिब्रेशन जयंत येवला, तसेच विभागीय प्रमुख म्हणून प्रदीप कुलकर्णी, विजय अग्रवाल, शिवाजी चमकीरे, अल्पेश गुजराथी, डॉ विलास कुलकर्णी, हरजीत सिंह वाधवा, सचिन जोशी यांची निवड केली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय संचालक जे पी सिंह, माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रेमचंद बाफना, नरेंद्र भंडारी, मल्टीपल चेयरमैन संदीप मालू यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. मावळते प्रांतपाल रमेश शहा यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडले.










