न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महापलिकेच्या अतिरिक्त आयुक्त ३ पदावर सुनिल थोरवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महसूल व वन विभागाचे सहसचिव डाॅ. माधव वीर यांनी दिले आहेत.
सुनिल थोरवे हे सातारा जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. तसेच पूर्वी मावळ-खेड विभागात प्रांताधिकारी तर महापालिकेत सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत होते.
सध्या पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त ३ या पदाचे कामकाज नगरविकास विभागाचे सहआयुक्त उल्हास जगताप हे पाहत आहेत. दरम्यान महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या पदावर सुनिल थोरवे यांची नियुक्ती झाल्याचे आदेश काढले आहेत. महापालिकेतील अधिकाऱ्याला डावलून पुन्हा शासन सेवेतील अधिका-याला एन्ट्री दिल्याने महापालिका वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
















