न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रु.) :- सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांनी निवृत्तीनंतर आपले राहून गेलेले आवडीचे छंद जोपासावे, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेतून माहे फेब्रुवारी २०१९ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतिचिन्ह, सेवा उपदान व अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करुन सन्मान
करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील कै. मधुकर पवळे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मनोज माछरे आदी उपस्थित होते.











