न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मार्च.) :- गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना जिल्हाप्रमुख, तालुका, उप-तालुका प्रमुख, शहरप्रमुख, विभागप्रमुख व प्रमुख शिवसैनिकांची नुकतीच बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी युतीची घोषणा केल्यानंतर सेना व भाजप पदाधिकाऱ्यांची ही पहीलीच बैठक मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत पार पडली. यावेळी सर्व शिवसैनिकांनी युतीचाच उमेदवार निवडुन आणण्यासाठी कटिबध्द राहावे, यासाठी छञपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वचन घेतले. यावेळी तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रामधील आसलपाणी गावामध्ये वीर बजरंगी हनुमानाच्या पुरातन मंदीराच्या नव्याने बांधण्यात येणाऱ्या मंदीराचे भुमीपुजन शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
तसेच शासनाने गेल्या साडेतीन वर्षापासून गोंदिया तहसील कार्यालयाची भव्य-दिव्य इमारत उभारली आहे. परंतु, केवळ श्रेयवादावरुन विना उद्घाटन रखडत पडलेल्या या इमारतीचे लोकार्पण झालेले नाही. यावेळी शिवसेना भंडारा-गोंदीया जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना तिरोडा-गोरेगाव विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांच्या प्रमुख उपस्थितीत, शेतकरी बांधवासाठी व शालेय विद्यार्थी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी शिवसेना स्टाईलने या इमारतीचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, अमरसिंग ठाकुर, लोकचंद भिसेन, संपर्कप्रमुख मनोज कपोते, बाबा ठाकुर, गोंदीया जिल्ह्यातील पदाधिकारी आदी उपस्थित होते.











