न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ मार्च) :- शिवशाही व्यापारीसंघाच्या निवड नियुक्तीचे सध्या पेव फुटले आहे. राज्यात संघटनेस आणखी बळ मिळावे यासाठी तालुका, जिल्हा व प्रदेश कार्यकारिणीवर मातब्बर पदाधिकाऱ्यांची निवड केली जात आहे.
याचाच भाग म्हणून प्रदेश अध्यक्ष तथा शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांच्या आदेशाने व प्रदेश सचिव गणेश आहेर यांच्या सुचनेने शिवशाही व्यापारी संघाच्या शीळ-फाटा, खोपोली अध्यक्षपदी अशोक ठकेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
छगन मुलाराम राठोड यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत उपाध्यक्षपदी भुषण आंग्रे, आनंद अग्रवाल, राकेश चव्हाण यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी शाखा प्रमुख राजु पींगले, शीव सहकार सेनेचे खोपोली अध्यक्ष हरीश काळे, उपशहर प्रमुख प्रसाद जी. वाडकर, शहर प्रमुख सुनील जी. पटली, उप नगराध्यक्ष राजु गायकवाड, व्यापारी राजू काबाडी, अमोल ठकेकर व शिवशाही व्यापारी संघाचे कार्यकर्ते व शिवसैनिक आदी उपस्थित होते.











